रिलायन्स म्युच्युअल फंडांच्या समभागसंलग्न (इक्विटी) प्रकारातील १० पैकी नऊ योजनांची कामगिरी ही संबंधित योजनांसाठी मानदंड म्हणून निर्धारित केलेल्या निर्देशांकांपेक्षा सरस राहिली आहे, असे क्रिसिल रिसर्चने म्हटले आहे. स्थापनेची १९ वर्षे पूर्ण करणाऱ्या या फंड घराण्याने आपल्या योजनांची कामगिरीच्या मापनासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत अभ्यासाचा हा नवीन पायंडा पाडला आहे.
रिलायन्स फोकस्ड लार्ज कॅप फंडाने २८ मार्च २००६ सालच्या आपल्या स्थापनेपासून आजवर ९.०७ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. या एकमेव फंडाचा अपवाद करता, ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत अन्य सर्व फंडांनी ‘सीएनएक्स निफ्टी’ या मानदंड (बेन्चमार्क) निर्देशांकांच्या १०.८० टक्के परताव्याच्या तुलनेत सरस परतावा देणारी कामगिरी केली आहे.
रिलायन्स स्मॉल कॅप फंडाने, तर सप्टेंबर २०१०च्या सुरुवातीपासून एस अँड पी बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकाला परताव्यात मात दिली आहे. या निर्देशांकाने १.२१
टक्क्यांचा परतावा या कालावधीत दिला, तर फंडाने २२ टक्क्यांच्या घरात परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.
‘क्रिसिल’ने अभ्यासलेल्या रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या १० इक्विटी डायव्हर्सिफाइड योजनांची एकूण गंगाजळी सप्टेंबर २०१४ अखेपर्यंत २५,९९६ कोटी रुपयांची आहे. ती देशातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण मुदतमुक्त इक्विटी योजनांच्या गंगाजळीचा ११ टक्के हिस्सा व्यापणारी आहे. यामध्ये १९९५ सालच्या स्थापनेपासून कार्यरत रिलायन्स ग्रोथ फंड आणि रिलायन्स व्हिजन फंड यांचाही समावेश आहे. त्या वेळी या योजनेत गुंतविलेले एक लाख रुपये आज अनुक्रमे ६६.३३ लाख रुपये आणि ३८.६५ लाख रुपये इतके वाढले असते, असे हा अहवाल दर्शवितो.
या सर्व योजनांचा मिळून एकत्रित ‘रिलायन्स इक्विटी कम्पोझिट इंडेक्स’ बनविण्यात आला आणि त्याची कामगिरी म्युच्युअल फंड उद्योगांचा मानदंड असलेल्या ‘क्रिसिल-अ‍ॅम्फी इक्विटी फंड परफॉर्मन्स इंडेक्स’शी आणि ‘सीएनएक्स निफ्टी’ या निर्देशांकाशी पडताळून पाहिली गेली. रिलायन्स निर्देशांकामध्ये या सर्व फंडांमध्ये एकत्रित एक लाख रुपये गुंतविले गेले असतील तर १५ वर्षांत २२.८० लाख रुपयांचा परतावा मिळेल, त्या उलट निफ्टी निर्देशांकाने ५.८९ लाख रुपयांचा परतावा दिला असता.
‘भारतीय अर्थव्यवस्थेने १.८० लाख कोटी डॉलरच्या आकारमानापर्यंत पोहोचण्यासाठी ६० वर्षांचा प्रवास केला, परंतु मला खात्री आहे की त्यात आणखी लाख कोटी डॉलरची भर ही पुढील सहा वर्षांत, तर आणखी लाख कोटी डॉलर हे नंतरच्या अवघ्या चार वर्षांत पडेल.’’              
संदीप सिक्का, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा