जर्मनीच्या अर्गो इंटरनॅशनलने भारतातील एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्समधील अतिरिक्त २२.९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. प्रति समभाग ९०.९७ रुपये दराने करण्यात आलेला हा व्यवहार एकूण १,१२२ कोटी रुपयांचा ठरला आहे.
देशातील विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा २६ टक्क्य़ांवरून ४९ टक्क्य़ांपर्यंत विस्तारानंतर गेल्या काही दिवसात निप्पॉन (रिलायन्स), अक्सा (भारती), बुपा (मॅक्स) आणि सन लाईफ (बिर्ला) या विदेशी भागीदारांनी त्यांच्या भारतातील व्यवसायातील हिस्सा वाढविला आहे.
एचडीएफसी आणि एर्गो इन्शुरन्स ग्रुप (जर्मनी) ची एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्समध्ये भागीदारी आहे. नव्या भागीदारी विस्ताराने एर्गोचा कंपनीतील हिस्सा सध्याच्या २५.८४ टक्क्य़ांवरून ४८.७४ टक्क्य़ांवर गेला आहे. तर एचडीएफसीची भागीदारी आधीच्या ७३.६३ टक्क्य़ांवरून ५०.७३ टक्क्य़ांवर आली आहे.
जर्मन भागीदार अर्गोचा एचडीएफसी लाईफमध्ये हिस्सा ४९ टक्क्य़ांवर
एचडीएफसी आणि एर्गो इन्शुरन्स ग्रुप (जर्मनी) ची एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्समध्ये भागीदारी आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यद
First published on: 19-12-2015 at 04:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ergo to increase its stake in hdfc ergo to