मोबाइलमधील अॅण्ड्रॉइडसमर्थ स्मार्टफोन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन फिनलॅण्डच्या नोकिया कंपनीलाही आपल्या व्यवसाय रचनेत अखेर अपरिहार्यपणे बदल करावा लागला. स्मार्टफोन क्षेत्रात काहीसे उशिरा उतरणाऱ्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबत मायक्रोसॉफ्टची साथ धरणाऱ्या नोकियाने स्मार्टफोन श्रेणीचा विस्तार करताना अॅण्ड्रॉईड तंत्रज्ञानावर आधारित हँडसेट्स तेही कमी किमतीत ‘नोकिया एक्स’ श्रेणीत बाजारात आणले आहेत. गेल्या काही वर्षांत बाजारहिस्सा वेगाने रोडावत असल्याचे पाहणाऱ्या नोकिया नाममुद्रेला हवाहवासा ‘एक्स फॅक्टर’ ही श्रेणी मिळवून देईल काय, हे आता पाहायचे? नोकियाचे भारतातील विपणन व्यवसायाचे संचालक विरल ओझा यांनी ८,५९९ रुपये किमतीचा ‘नोकिया एक्स’ सोमवारी मुंबईत सादर केला. डय़ुएल सिम, ४ इंच स्क्रीन, ३ मेगा पिक्सल कॅमेरा आदी वैशिष्टय़े असणाऱ्या एक्समध्ये ‘गुगल प्ले’ नसले तरी स्काइप व आऊटलुक यात मात्र समाविष्ट करण्यात आले आहे. कंपनी याचबरोबर एक्स+ व एक्सएल हे ८,४०० व ९,२०० रुपयांचे याच धर्तीवरील दोन स्मार्टफोन येत्या दोन महिन्यांत भारतात सादर करणार आहे.
अत्यावश्यक ‘एक्स फॅक्टर’!
मोबाइलमधील अॅण्ड्रॉइडसमर्थ स्मार्टफोन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन फिनलॅण्डच्या नोकिया कंपनीलाही आपल्या व्यवसाय रचनेत अखेर अपरिहार्यपणे बदल करावा लागला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-03-2014 at 01:03 IST
TOPICSगुगल प्लेGoogle PlayनोकियाNokiaबिझनेस न्यूजBusiness NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi NewsमोबाइलMobiles
+ 2 More
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Essential x factor