भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेन्ट ट्रस्ट’ची (आरईआयटी) मार्गदर्शक तत्त्वे जाहिर झाली असतानाच देशातील या उद्योगाकडून व्यवसाय वृद्धीच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र प्रस्थापित विकासकांना अद्यापही कंपन्या, प्रकल्प यांच्या नाममुद्रेवरच अधिक विश्वास असून नव्या पिढीच्या विकासकांना भांडवल उभारणी महत्त्वाची वाटते.
भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलेल्या ‘ पॉझिटिव कन्सिल्टग प्रायव्हेट लिमिटेड’ या आघाडीच्या वित्तीय पर्याय व सल्लासेवा संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. कंपनीने या क्षेत्राच्या स्थित्यंतराच्या पलूंचे विश्लेषण करणारे संशोधन जारी केले आहे.
यानुसार बाजारपेठेची मानसिकता बदलल्याने स्थावर मालमत्ता क्षेत्रात पुन्हा एकदा आत्मविश्वास आला आहे. आगामी काळात या उद्योगाच्या भवितव्याला आकार देणारे अनेक मूलभूत बदल समोर उभे असून प्रगतीला चालना देणाऱ्या घटकांचे स्थावर मालमत्ता गुंतवणूक व विकासावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहेत.
‘पॉझिव्’ाू कन्सिल्टग’ने भारतीय स्थावर मालमत्ता उद्योगाच्या स्थित्यंतरात प्रगतीला चालना देण्याचा हा दृष्टीकोन निश्चित करण्यासाठी संशोधन केले असून त्यात बदलती वित्तीय प्राधान्ये, तसेच पहिल्या पिढीतील (जुन्या) व दुसऱ्या पिढीतील (नव्या) विकासकांपुढील समस्या ठळकपणे मांडल्या आहेत.
या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या प्रगतीवर नाममुद्रा आणि भांडवल हे घटक सर्वाधिक प्रभाव टाकतील आणि त्यापाठोपाठ जमीन व बाजारपेठेच्या भावनांचा क्रमांक असेल.
नाममुद्रा आणि भांडवलाबाबत जुन्या व नव्या विकसकांचा प्राधान्यक्रम वेगळा आहे. नव्या विकासकांनी पारंपरिक दृष्टीकोन न बाळगता वेळोवेळी भांडवल उभारणीला महत्त्व दिले आहे. तर प्रस्थापित विकासकांनी ग्राहकांबाबतच्या अनुभवाच्या जोरावर नाममुद्रा हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असल्याचे मान्य केले आहे. नाममुद्रेवर विसंबून राहणे हा त्यांच्या प्राधान्याचा अविभाज्य भाग आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी प्रगतीच्या पलूंपकी वित्तपुरवठा हा एक आहे. कोणत्याहीस्थावर मालमत्ता नाममुद्रेसाठी हा पलू प्रगतीच्या महत्त्वपूर्ण चालकांपकी एक असतो. स्थावर मालमत्तेमधील वित्तपुरवठय़ाचा मुद्दा येतो, तेव्हा जुन्या व व नव्या विकासकांचा दृष्टिकोन, अपेक्षा व चिंता यांमध्ये किंचितसा बदल झालेला दिसतो. याबाबतच्या अभ्यासातून असे दिसले, की जुने विकासक खासगी भांडवलाला प्राधान्य देतात तर तरुण विकासक भांडवल उभारणीचा कोणताही स्रोत पसंत करतात. ज्यामुळे प्रकल्प विकास कमीतकमी वेळात होऊन त्यातूनच पुढे भक्कम नाममुद्रेची निर्मिती होईल.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनित देव यांनी सर्वेक्षणातील निष्कर्षांबाबत सांगितले की, हे संशोधन हाती घेण्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्थावर मालमत्ता उद्योगासाठी विकासाभिमुख वित्तीय पर्याय विकसित करण्यासाठी नव्या व प्रस्थापित विकसकांचे बदलते दृष्टीकोन व भावना समजून घेणे, हे होते. किफायतशीर घरबांधणी व स्मार्ट शहरांबाबत सरकारकडून नुकत्याच घोषणा करण्यात आल्या असल्याने या क्षेत्रात व दृष्टीकोनातही वैचारिक व प्रक्रियात्मक बदल होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. नाममुद्रा आणि भांडवल हे दोन्ही घटक स्थावर मालमत्तेतील वित्तपुरवठय़ाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे विकासकांच्या दोन्ही गटांनी समजून घेणेही आवश्यक आहे, असेही यानिमित्ताने सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा