केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलवरील अबकारी कर लिटरला ३० पसे तर डिझेलवरचा अबकारी कर लिटरला १ रु. १७ पशांनी वाढवला आहे. त्यातून सरकारला २५०० कोटींचा महसूल मिळणार आहे. आता पेट्रोलवरचा अबकारी कर ७ रु. ६ पसे ऐवजी ७ रु. ३६ पसे असेल व डिझेलवरील अबकारी कर ४ रुपये ६६ पसे एवजी ५ रु. ८३ पसे राहील.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले, की अबकारी कर वाढवल्याने ३१ मार्च २०१६ अखेर २५०० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. आता या करवाढीमुळे पेट्रोलवरील एकूण कर लिटरला १९ रुपये ३६ पसे झाला आहे. तो आधी १९ रुपये ६ पसे होता. डिझेलवरचा कर १० रुपये ६६ पसे होता तो आता ११ रुपये ८३ पसे झाला आहे. प्रमाणित पेट्रोलवरचा कर लिटरला ८ रुपये २४ पसे होता तो आता ८ रुपये ५४ पसे झाला आहे तर प्रमाणित डिझेलवरचा कर ७ रुपये २ पसे होता तो ८ रुपये १९ पसे झाला आहे. अबकारी करात गेल्या सहा आठवडय़ात ही दुसरी वाढ करण्यात आली आहे. सात नोव्हेंबरला पेट्रोलवरचा अबकारी कर १ रु. ६० पसे तर डिझेलवरचा अबकारी कर लिटरला ३० पशांनी वाढवला होता. जागतिक पातळीवर तेलाचे भाव कमी झाल्याने काल पेट्रोलचे दर लिटरला ५० पसे तर डिझेलचे दर लिटरला ४६ पसे कमी करण्यात आले होते. आधीच्या अबकारी कर वाढीतून सरकारला ३२०० कोटी रुपये मिळाले आहेत. सरकारच्या कर संकलनाला यातून मोठा आधार मिळाला आहे.

Story img Loader