वाहन, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात कार्यरत आघाडीच्या महिंद्र समूहाने लहान मुलांच्या कपडे निर्मितीतील अमेरिकेच्या कंपनीची उत्पादने भारतात सादर करण्याच्या घोषणेसह किरकोळ विक्री क्षेत्रात विस्तार केला आहे.

‘कार्टर्स टू बेबीओये’ या अमेरिकेतील लहान मुलांचे तयार कपडे महिंद्र रिटेलच्या माध्यमातून भारतातील विविध शहरांमधील ४० दालनांमधून तसेच बेबीओये.कॉम संकेतस्थळावर उपलब्ध होईल, अशी घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वाकणकर (छायाचित्रात मध्यभागी) यांनी बुधवारी दिली. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष झुबेन भिवंडीवाला, अमेरिकेच्या दूतावासातील अधिकारी दियाना आबदिन, अभिनेत्री मंदिरा बेदी, कार्टर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष केव्हिन कॉनिर्ंग आदी उपस्थित होते.

याचबरोबर महिंद्र समूहाने तिच्या महिंद्र हॉलिडेज अ‍ॅन्ड रिसॉर्ट्स इंडियाच्या माध्यमातून फिनलॅन्डस्थित सायमा गार्डन्स एरेने ओये या आदरातिथ्य क्षेत्रातील सेवा कंपनीचे अधिग्रहणही केले आहे.

Story img Loader