वापरलेल्या मोटारींच्या खरेदी आणि विक्रीमध्ये आजवर अग्रेसर असलेले ऑनलाइन दालन ‘कारट्रेड डॉट कॉम’ने आता प्रत्यक्ष आपले पहिले फ्रँचाइझी स्टोअर ठाण्यात सुरू केले आहे. अलिकडे वापरलेल्या कारबाबत ग्राहकांचा वाढता कल व बदललेली मानसिकता पाहता, अशी देशभरात आणखी १०० फ्रँचाइझी दालने आगामी १० ते १२ महिन्यांत सुरू करून आक्रमक विस्तार साधण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कारट्रेड डॉट कॉमने ठाण्यात संकल्प हाइट्स, ज्युपिटर हॉस्पिटल समोर, ठाणे (प.) येथे ग्लोबस मोटर्स या फ्रँचाइझी भागीदाराच्या सहाय्याने स्टोअर थाटले आहे. नव्याने सुरू केलेले फ्रँचाइझी स्टोअर ही ग्राहकांप्रती टाकलेले नाविन्यपूर्ण पाऊल आहे, असे कारट्रेड डॉट कॉमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय सांघी यांनी सांगितले. वेबसाइटद्वारे जुनी वा वापरलेली कारची खरेदी किंवा विक्री करू इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होतच होती, पण नव्या स्टोअरद्वारे ग्राहकांच्या कार खरेदी-विक्रीच्या अनुभूतीला परिपूर्ण केले जाईल, असे सांघी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा