भारतातील निर्यातीने गेल्या आठ महिन्यात प्रथमच सकारात्मक कामगिरी बजावली आहे.  जानेवारी २०१३ मध्ये निर्यात वाढली असली तरी या कालावधीत आयातीतही वाढ झाल्याने एकूण व्यापार तूट तीन महिन्याच्या उच्चांकाला मात्र पोहोचली आहे.
जानेवारीमध्ये निर्यात २५.५८ अब्ज डॉलर झाली असून वार्षिक तुलनेत ती ०.८२ टक्क्यांनी अशी किंचित अधिक आहे. अभियांत्रिकी वस्तू, वस्त्र, हिरे व दागिने उत्पादनांना देशाबाहेर यंदा मागणी वाढल्याने ही वर्धिष्णू कामगिरी बजावता आली आहे.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये २५.३७ अब्ज डॉलरच्या निर्यात कामगिरीनंतर, बिकट जागतिक परिस्थतीमुळे देशाची निर्यात मे २०१२ पासून सतत घसरणीच्या यादीत होती. एप्रिल २०१२ ते जानेवारी २०१३ दरम्यान मात्र निर्यात ४.८६ टक्क्यांनी खालावली असून २३९.६ अब्ज डॉलर झाली आहे.
यंदाच्या जानेवारीत आयातही ६.१२ टक्क्यांनी वाढली असून ४५.५ अब्ज डॉलपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आयात-निर्यातीतील दरी यंदा अधिक रुंदावली गेली. तथापि वाढत्या निर्यातीमुळे व्यापार तुटीचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागेल, असा विश्वास सरकार पातळीवर व्यक्त करण्यात आला.
एप्रिल २०१२ ते जानेवारी २०१३ दरम्यान आयात ०.०१ टक्क्याने वधारून ४०६.८ अब्ज डॉलर झाली आहे. या १० महिन्याच्या कालावधीत व्यापार तूट १६७.१६ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. जानेवारीतील व्यापार तूट ही चालू आर्थिक वर्षांतील दुसरी मोठी नोंदली गेलेली तूट आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१२ मध्ये २०.९ अब्ज डॉलर व्यापार तूट नोंदली गेली आहे. सरकारसाठी चिंताजनक असलेली ही तूट मार्च २०१३ अखेर कमी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र डिसेंबरमध्ये नोंदले गेलेले उणे ०.६ टक्के औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सलग दुसऱ्या महिन्यात खालावत आला आहे. एप्रिल ते डिसेंबर या दरम्यानही हा दर ०.७ टक्के राहिला आहे. केंद्रीय सांख्यिकी संघटनेने चालू आर्थिक वर्षांसाठी विकासदराचा अंदाज ५ टक्के राहण्याची शक्यता वर्तविली आहे. प्रत्यक्षात तसे झाल्यास हा दशकातील सर्वात कमी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला अपेक्षित महसूल गाठण्यास काही कालावधी निश्चितच लागेल. अत्याधुनिक व्यासपीठावर नवी  संधी शोधत या क्षेत्रातील कंपन्यांची आगेकूच योग्य दिशेने सुरू आहे.
एन. चंद्रशेखरन
नॅसकॉमचे अध्यक्ष

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला अपेक्षित महसूल गाठण्यास काही कालावधी निश्चितच लागेल. अत्याधुनिक व्यासपीठावर नवी  संधी शोधत या क्षेत्रातील कंपन्यांची आगेकूच योग्य दिशेने सुरू आहे.
एन. चंद्रशेखरन
नॅसकॉमचे अध्यक्ष