भाज्या तसेच दुग्धजन्य पदार्थाच्या दरांनी उसंत खाल्ल्याने मेमधील किरकोळ महागाईचा दर तीन महिन्यांच्या नीचांकावर स्थिरावला आहे. मेमध्ये हा दर ८.२८ टक्के राखला गेला आहे.
चालू आर्थिक वर्षांची सुरुवात वाढत्या औद्योगिक उत्पादन दर व सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाई दर विसावल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर महिन्याभरापूर्वी, एप्रिलमध्ये ८.५९ टक्के होता. तर २०१४ मधील मार्च व फेब्रुवारीमध्ये तो अनुक्रमे ८.३१ व ८.०३ टक्के राहिला आहे.
मेमधील अन्नधान्याच्या महागाईचा दर एप्रिलच्या ९.६६ टक्क्यांच्या तुलनेत किरकोळ घसरून ९.५६ टक्के नोंदला गेला आहे. गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती १५.२७ टक्क्यांनी तर डाळींचे भाव ८.८१ टक्के कमी झाले आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या किमतीही कमी होत ११.२८ टक्क्यांवर आले आहेत. ते एप्रिलमध्ये ११.४२ टक्के होते. या कालावधीत फळांचे दर मात्र वधारत तब्बल २३.१७ टक्क्यांवर गेले आहेत. सावरलेल्या किरकोळ महागाई दरानंतर आता सोमवारी जाहीर होणाऱ्या घाऊक किंमत निर्देशांकावर नजर असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा