देशाच्या अर्थ चक्रातील एक पाते म्हणून गणले जाणाऱ्या औद्योगिक उत्पादनाने गेल्या दोन दशकातील नीचांक साधत भारतातील विकास रथ संथ गतीने चालत असण्यावर शिक्कामोर्तब केले. २०१२-१३ या गेल्या आर्थिक वर्षांत औद्योगिक उत्पादन दर अवघ्या एक टक्क्यांवर विसावला आहे. तर जानेवारी २०१३ नंतर सलग मार्चपर्यंत (मार्चमध्ये २.५%) वधारणाऱ्या दराबद्दल सरकारने मात्र आनंद व्यक्त केला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांतील एकूण दरासह मार्च २०१३ मधील औद्योगिक औद्योगिक उत्पादनाकडे तमाम अर्थव्यवस्थेचे लक्ष लागले होते. शुक्रवारी याबाबतची आकडेवारी केंद्र सरकार पातळीवरून जाहीर झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया भांडवली बाजारानेही दिली. देशाच्या कमी विकास दराचे महत्त्वाचे कारण ठरलेली औद्योगिक प्रगती साधण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून किमान अध्र्या टक्क्यांची व्याजदर कपातीच्या उद्योग क्षेत्राच्या अपेक्षेलाही यंदा हरताळ फासला गेला.
२०११-१२ या आर्थिक वर्षांत २.९ टक्क्यांवर गेलेला औद्योगिक उत्पादनाचा दर २०१२-१३ मध्ये एक टक्क्यापर्यंत खाली आला आहे. तर मार्च २०१३ मधील वर्षभरापूर्वीच्या ६ टक्क्यांच्या तुलनेत २.५ टक्क्यांवर आला आहे. मात्र २०१३ वर्षांच्या सुरुवातीपासून तो चढता राहिला आहे.
२०११-१२ या आर्थिक वर्षांतील शेवटच्या मार्च महिन्यात हा दर ०.६ टक्के होता. जानेवारी २०१३ पासून तो यंदाच्या मार्चपर्यंत सतत वधारता राहिला आहे. मात्र गेल्या एकूण आर्थिक वर्षांतील एक टक्के औद्योगिक उत्पादन दर हे ९० च्या दशकातील मंदीच्या समीप जाऊन पोहोचला आहे. १९९१-९२ मध्ये हा दर ०.६ टक्के होता.
सरकार – उद्योजक लवकरच चर्चा
औद्योगिक क्षेत्रातील निराशा दूर करण्याचा एक प्रयत्न करावयच्या उपाययोजना पडताळून पाहण्यासाठी संबंधित उद्योग धुरिणांशी चर्चा करण्याची तयारी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी दाखविली आहे. यानुसार, सरकार आणि स्थापित उद्योग कृती दल यांच्यात बैठक होणार आहे. (अशा प्रकारचा दल जुलै २०११ मध्ये स्थापन करण्यात आला होता.) निर्मिती क्षेत्रातील वाढ पूर्वपदावर येण्यासाठी सरकार स्तरावर करावयाच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा होईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी निर्यात क्षेत्राला यापूर्वीच सढळ हस्ते सरकारतर्फे सहकार्य करण्यात आले आहे. संथ विकासदराबरोबरच वाढत्या वित्तीय व चालू खात्यातील देशातील तूट चिंताजनक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्ष             औद्योगिक उत्पादन    सकल उत्पादन
२०१२-१३          १%                          ५%
२०११-१२         २.९%                      ६.२%
२०१०-११         ८.२%                      ९.३%
२००९-१०         ५.३%                     ८.६%
२००८-०९        २.५%                    ६.७%
२००७-०८        १५.५%                 ९.३%
२००६-०७        १२.९%                  ९.६%
२००५-०६        ८.६%                    ९.५%

वर्ष             औद्योगिक उत्पादन    सकल उत्पादन
२०१२-१३          १%                          ५%
२०११-१२         २.९%                      ६.२%
२०१०-११         ८.२%                      ९.३%
२००९-१०         ५.३%                     ८.६%
२००८-०९        २.५%                    ६.७%
२००७-०८        १५.५%                 ९.३%
२००६-०७        १२.९%                  ९.६%
२००५-०६        ८.६%                    ९.५%