आर्थिक सुधारणांचा वेग मंदावल्याने गुंतवणुकीवर परिणाम
भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग मंद असून त्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहे, असे असले तरी काही कंपन्यांना समावेशक पतधोरण व काही मूलभूत आर्थिक घटक मजबूत झाल्याने फायदाही मिळाला आहे, असे मत मुडीज या गुंतवणूक संस्थेने म्हटले आहे.
अमेरिकेने व्याजदरात वाढ करण्याच्या शक्यतेनेही भारताच्या आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो असेही मुडीजने सांगितले. वस्तू व सेवा कर विधेयक तसेच भूमी अधिग्रहण विधेयक मंजूर करून घेण्यात सरकारला आलेले अपयश गुंतवणुकीवर विपरित परिणाम करणारे आहे. कारण त्यामुळे आर्थिक सुधारणांचे भवितव्य टांगणीला लागले आहे, असे सांगून मुडीजने असे स्पष्ट केले की, मार्च २०१७ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा ७.५ टक्के राहील व त्यात उद्योग वाढी उत्पादन प्रक्रियेतील साथ मिळेल.
मुडीजचे उपाध्यक्ष विकास हलान यांनी म्हटले आहे की, एकंदरीत देशांतर्गत परिस्थिती कंपन्यांना अनुकूल असली तरी आर्थिक सुधारणांना खीळ बसल्याने त्याचा फटका यापुढे बसू शकतो. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आर्थिक सुधारणांसाठीची विधेयके मंजूर होणे अवघड दिसते कारण तेथे सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा