व्याजदर कपातीच्या आशा धुळीला!
साखर, भाज्या, खाद्यतेल अशा अन्नधान्यांचे दर चढे राहिल्याने नोव्हेंबरमधील महागाई दर ९.९० टक्क्यांच्या भयंकर पातळीवर गेले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाई दर १० टक्क्यांनजीक राहिला आहे. ऑक्टोबरमधील वधारत्या औद्योगिक उत्पादनदराने जानेवारीमध्ये व्याजदर कपातीची शक्यता वर्तविली जात असली तरी आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या रिझव्र्ह बँकेच्या मध्य-तिमाही पतधोरणात तरी ती होणार नाही, हेच यंदाच्या या महागाईदराने सूचित केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून महागाईचा दर १० टक्क्यांच्या समीप राहिला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये तो अनुक्रमे ९.७३ आणि ९.७५ टक्के राहिल्यानंतर यंदाच्या ऐन दिवाळीच्या महिन्यात तर त्याने कडीच केली. साखर, डाळी, भाज्या, मांसाहारी पदार्थ यांच्या दुहेरी आकडय़ातील किंमतवाढीमुळे ग्राहक किंमत निर्देशांकातील तेलादी विभाग नोव्हेंबरमध्ये कधी नव्हे ते १७.६७ अशा विक्रमी स्तरावर गेले आहे. रिझव्र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण येत्या आठवडय़ात, १८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. तर तिसऱ्या तिमाही पतधोरणाचा आढावा २९ जानेवारी रोजी घेतला जाणार आहे. महागाई जोपर्यंत ५ ते ६ टक्के या सहनशील पातळीवर येत नाही तोवर व्याजदर कमी करणार नाही, असे रिझव्र्ह बँकेचे कडवे धोरण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा