फियाट ऑटोमोबाईल इंडिया प्रा. लि.ने भारतात स्वतंत्रपणे आपले विक्री-जाळे स्थापण्याची घोषणा केली आहे. आजवर फियाटच्या वाहनांसाठी टाटा मोटर्सबरोबर सुरू असलेले वितरणविषयक सामंजस्यही संपुष्टात येत असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करताना, विपणन, विक्री आणि विक्रीपश्चात सेवा या सर्वासाठी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये कंपनीकडून स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाणार आहे.
विद्यमान जागतिक व्यवस्थेत सर्वात गतिशील भारतीय वाहन बाजारपेठेतील प्रमुख हिस्सा काबीज करण्याच्या दृष्टीने हे पाऊल टाकले गेले आहे, असे फियाट ऑटोमोबाईल इंडियाचे संचालक एनरिको अँटेनॅसियो यांनी या प्रसंगी बोलताना स्पष्ट केले. स्वतंत्र ‘राष्ट्रीय विक्री कंपनी (एनएससी)’च्या स्थापनेमागील सगळ्यात मोठा उद्देश हा भारतीय बाजारपेठेतील दीर्घकालीन व्यूहरचना व विकास योजनांना गती देणे हाच असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीने एकात्मिक विपणन अभियानाला याच्या बरोबरीनेच सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपले बेवस्थळ (www.fiat-india.com) केले आहे, जे थेट विक्रेत्याच्या व्यवस्थापन प्रणालीशी जोडले जाणार आहे. अहोरात्र सुरू असणारे कॉल सेंटर हे ग्राहकसेवेसाठी सदैव तत्पर असलेली मार्गदर्शक-वाहिनी बनेल, असा विश्वासही अँटेनॅसियो यांनी व्यक्त केला.

Story img Loader