अर्थ खात्याची सरकारला स्पष्ट सूचना
नवी दिल्ली : आर्थिक विवंचनेपोटी कर्मचाऱ्यांचे वेतनही देऊ न शकलेल्या सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंदच करण्याची सूचना सरकारला करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने सादर केलेला सार्वजनिक कंपन्यांसाठी ७४,००० कोटी रुपये अर्थसाहाय्य प्रस्तावही फेटाळून अर्थ खात्याकडे लावला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) वर ९५,००० कोटी रुपयांचा अर्थभार आहे. उभय कंपन्यांमध्ये १.६५ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाचा प्रस्तावही बारगळला आहे.सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंद करणे फारसे आर्थिक नुकसानीचे ठरणार नाही, असे केंद्रीय अर्थ खात्याचे म्हणणे आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेण्याचीही सरकारची तयारी असल्याचे सांगण्यात येते.