मनुष्यबळ विकास अर्थात एचआर. सध्याच्या आर्थिक मंदीच्या वातावरणात तर अधिक तारेवरची कसरत या पदावरील व्यक्तींना करावी लागते. मर्सिडिज बेन्झ ही आलिशान श्रेणीतील कार मुळच्या जर्मन कंपनीची. आतापर्यंत तिच्या भारतातील व्यवसायाच्या ‘कॉर्पोरेट अफेअर्स’ विभागाचा कार्यभार हाताळणाऱ्या सुहास कडलस्कर यांच्यांकडे मनुष्यबळ विकासाचीही जबाबदारी आली आहे. सद्यस्थितीत त्यांची एचआरप्रमुख म्हणून भूमिका..
‘मर्सिडिज’मध्ये सध्या कोणती आव्हाने तुम्ही पाहता?
विशेष अशी सध्या आमच्यासमोर कुठलीही मोठी आव्हाने नाहीत. मात्र प्रगतीच्या कालावधीत प्रशिक्षण आणि विकासात्मक कार्यावर भर देऊन यश मिळवण्यालाच आमचे प्राधान्य असेल.
नोकरी सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण किती? ते रोखण्यासाठी काय प्रयत्न आवश्यक..
आमच्याकडील नोकरी सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. कर्मचारीभिमुख मनुष्यबळ विकास धोरणांमुळे आम्ही ते कमी राखू शकतो. यात कर्मचाऱ्यांना केवळ आकर्षक वेतन आणि इतर फायदे न देता अतिशय चांगल्या आणि आकर्षक प्रगतीच्या संधीदेखील दिल्या जातात. त्यामुळे कर्मचारी टिकून ठेवण्यास मदत झाली. शिवाय कर्मचारी समाधान सर्वेक्षणातून आमचे सातत्याने त्याकडे लक्ष असते. ज्याठिकाणी सुधारण्याची संधी दिसते तिथे आम्ही त्यांच्यामध्ये नक्तीच बदल घडवून आणतो.
‘टॅलेंट’ टिकवून ठेवण्याचे आव्हान कसे पेलले जाते?
आव्हानात्मक जबाबदारी सोपवून, कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण, संपूर्ण सक्षमता, अधिकाधिक क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य यातून लक्ष ठेवत असतो.
माणसे निवडताना सर्वात मोठे आव्हान कोणते असते?
देशात दरवर्षांला ३ लाखाहून अधिक अभियंते तयार होत असले तरी त्यातील फारच कमी रोजगारक्षम असतात. या आव्हानावर प्रशिक्षणाच्या माध्यमातून मात करता येते.
कर्मचाऱ्यांमधील समाधान आणि असमाधान कसे ओळखावे?
नियमित कालावधीनंतर कर्मचारी समाधान सर्वेक्षणासारखी विविध सर्वेक्षणे करतो. यात कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या धोरणांवर तसेच कामाच्या पद्धतीवर आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत होते.
या विभागाचे प्रमुख म्हणून धोरणांसंदर्भात बदलाच्या कोणत्या प्रमुख तीन बाबी सांगता येतील?
या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना अन्य विभागांमध्येही काम करण्यास सांगावे. त्यामुळे विभागाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल.
कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाची धोरणे आणि नियमावलींमध्ये संस्थेतील विविध ठिकाणांनुसार बदल व्हावेत.
कर्मचारी निगडीत कामाध्ये अधिकाधिक लवचिकता – जसे की, कामाची लवचिक वेळ, लवचिक वेतन आणि कामाची बदलती ठिकाणे वगरे.
आíथक संकटाचा एचआरवर कसा परिणाम झाला?
सध्याच्या आíथक संकटाचा आमच्या विभागावरही काही प्रमाणात परिणाम झालाच आहे. कर्मचारी भरतीबाबत आम्ही सावध होतो. प्रशिक्षण आणि नवनवीन गोष्टी शिकणे सुरू असल्याने मंदीच्या कालावधीचा उपयोग आम्ही दीर्घकालिन आणि मध्यकालिन धोरणे अधिक सक्षम करण्यासाठी केला. यामुळे भविष्यातील आव्हानांना तोंड द्यायला सक्षम होऊ.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात संस्थेमधील एचआरच्या प्रत्यक्ष हिस्सेदारीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. मर्सिडिजच्या संदर्भात यावर तुमची प्रतिक्रिया काय?
कुठल्याही कंपनीमध्ये उत्पादन, विक्री किंवा विपणनाप्रमाणेच मनुष्यबळ विकासाचे महत्त्व आहे. यामध्ये कर्मचारी कंपनीची धोरणे, त्यांची अमलबजावणी करतात, असे आम्ही मानतो. कर्मचाऱ्यांचे नवीन गुण आकर्षति करण्यात आणि ते टिकवून त्याला वाव देण्यासाठी हा विभाग भूमिका बजावते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा