विद्यमान आर्थिक वर्षांत तब्बल ७३,३८८ करदात्यांनी रु. ३,८५९ कोटींचा कर-भरणा करण्यात कुचराई केल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असून, या मंडळींवर दंडात्मक कारवाईसाठी पावले टाकली गेली असल्याचे बुधवारी सांगण्यात आले. विशेषत: स्वयं विवरणपत्रे दाखल करणाऱ्या करदात्यांना या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
कर-विवरणपत्र दाखल करताना, मान्य केलेले निर्धारीत कर-दायित्व चुकते न करणे म्हणजे असा करदाता हा प्राप्तिकर कायद्याच्या परिभाषेत थकबाकीदार ठरतो आणि अशी मंडळी दंडात्मक कारवाईलाही पात्र ठरतात, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे सर्व स्रोतातून येणाऱ्या करपात्र उत्पन्नावर निश्चित होणाऱ्या कराचा आगाऊ आणि कर-विवरणपत्र (रिटर्न) दाखल करण्यापूर्वी भरणा केला जायला हवा. मात्र विवरणपत्र दाखल केले आणि त्यात दाखविलेले करदायित्व चुकतेही केले नाही अशांचे प्रमाण २०१२ सालात ७३,३८८ कोटींच्या घरात जाणारे असल्याचे दिसून येते.

Story img Loader