भारतीय हवाई क्षेत्रात पुन्हा पंख पसरविण्यासाठी टाटा सन्सला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. एअर आशियाबरोबरच्या प्रवासी वाहतूक भागीदारीसाठीचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाने पारित केला आहे.
मलेशियाच्या एअर आशियाने टाटा सन्सबरोबर भारतीय हवाई वाहतूक सेवेसाठी उत्सुकता दाखविल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला होता. कंपनी मेपासून निवडक निमशहरांमध्ये देशांतर्गत उड्डाणे सुरू करेल.
नव्या व्यवसायात सुरुवातील ८० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ४९ टक्के हिस्सा एअर आशियाचा, ३० टक्के टाटा सन्सचा तर उर्वरित २१ टक्के भागीदारी टेलिस्ट्रा ट्रेडप्लेसची आहे.
थायलंड आणि मलेशिया कार्यक्षेत्र असलेल्या एअर आशियाची सध्या भारतातील चेन्नई, बंगळुरू, कोची, तिरुचिरापल्ली आणि कोलकत्ता येथून विविध २० देशांमध्ये उड्डाणे होतात.
नवी कंपनी आपल्या निवडक ३ ते ४ विमानांद्वारे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हवाई जाळे विणेल. कंपनीचे मुख्यालय चेन्नई येथेच राहणार आहे. भारताबाहेर उड्डाणे करण्यासाठी एअर आशियाला देशात पाच वर्षे व्यवसाय बंधनकारक आहे.
टाटा समूहाचे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये (टाटा एअरलाईन्स) भारतीय हवाई वाहतूक कंपनी सुरू केली होती. दोन दशकानंतर तिचे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया असे नामकरण झाले.
एअर-आशियासह टाटांच्या हवाई पुन:प्रवेशाला हिरवा कंदील
भारतीय हवाई क्षेत्रात पुन्हा पंख पसरविण्यासाठी टाटा सन्सला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. एअर आशियाबरोबरच्या प्रवासी वाहतूक भागीदारीसाठीचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाने पारित केला आहे.मलेशियाच्या एअर आशियाने टाटा सन्सबरोबर भारतीय हवाई वाहतूक सेवेसाठी उत्सुकता दाखविल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-03-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fipb approves airasia tata airline plan