सुमारे १०० अब्ज डॉलरच्या समूहाची मुख्य सूत्रे दीड महिन्यापूर्वी हाती घेणाऱ्या सायरस मिस्त्री यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिली नियुक्ती जाहीर केली आहे. टाटा सन्समध्ये गेल्या १८ वर्षांपासून असलेले आणि समूहात  प्रशासकीय सेवा अधिकारी म्हणून कारकिर्द सुरु करणारे डॉ. मुकुंद गोविंद राजन यांना समूहाचे मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांनी अधिक जवळ केले आहे. तर टाटा कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रविण कडले यांना सिंगापूरस्थित टाटा अपॉच्र्युनिटी फंडच्या भारतीय सल्लागार मंडळावर सदस्य म्हणून मिस्त्री यांनी नियुक्त केले आहे.

Story img Loader