केंद्रात मोदी सरकारच्या स्थापनेबरोबरीने सुधारलेल्या गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा प्राथमिक भांडवली बाजाराला लाभकारकतेची कसोटी म्हणून सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच आलेल्या स्नोमॅन लॉजिस्टिक्स या कंपनीच्या मंगळवारपासून खुल्या होत असलेल्या प्रारंभिक भागविक्रीतून लागणार आहे. निर्गुतवणुकीचे विक्रमी लक्ष्य ठेवलेल्या मोदी सरकारच्या दृष्टीनेही या भागविक्रीला चांगला प्रतिसाद मोलाचा ठरणार आहे.
स्नोमॅन लॉजिस्टिक्स लिमिटेडने प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एकूण ४.२ कोटी भांडवली समभागांची भागविक्री बुक बििल्डग प्रक्रियेद्वारे प्रस्तावित केली आहे. भागविक्रीसाठी किंमतपट्टा प्रत्येकी ४४ रुपये ते ४७ रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. या भागविक्रीचे कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलात २५.२३ टक्केयोगदान असेल. किमान ३०० समभागांसाठी आणि त्यानंतर ३००च्या पटीत या भागविक्रीत गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. ‘क्रिसिल’कडून ४/५ असे सरस मानांकन मिळालेली ही भागविक्री २८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. भागविक्रीतून कंपनीला १८४ कोटी ते १९७ कोटींचा निधी उभा राहणे अपेक्षित आहे, ज्याचा वापर दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी केला जाणार आहे.
स्नोमॅन लॉजिस्टिक्स या १९९३ मध्ये स्थापित झालेल्या कंपनीकडून मासे, मांस, कोंबडी, फळे, भाज्या पुरवठादार, निर्यातदार यांना आंतरशहर आणि शहरांतर्गत माल वाहतूक सेवा पुरविते. कंपनीकडे देशभरात १४ ठिकाणी २३ तापमान नियंत्रक गोदामांचा समावेश आहे आणि ३१ मार्च २०१४ पर्यंत, कंपनीच्या ताफ्यात ३०७ भाडे तत्त्वावरील व ६३ स्वत:ची वाहने अशी ३७० रीफर वाहने आहेत. कंपनीच्या ग्राहकांमध्ये हिंदुस्तान युनिलीव्हर, अल् करीम एक्स्पोर्ट्स, मॅकेन फूड, फेरो इंडिया यांचा समावेश होतो.
मूळ अमल्गम फूड्स लि. या नावाने सुरुवात करणाऱ्या या कंपनीमध्ये २३ टक्केहिस्सा १९९७ साली हिदुस्तान लिव्हरने विकत घेतला. २००१ मध्ये उर्वरित सर्व हिस्सा जपानच्या मित्सुबिशी कॉर्पोरेशनने विकत घेतला. तर २००६ मध्ये कंपनीचे विद्यमान प्रवर्तक गेटवे डिस्ट्रिपार्क्स लिमिटेडने बहुसंख्य हिस्सा विकत घेऊन तिच्यावर ताबा मिळविला.
केंद्रातील सत्ताबदलानंतरची पहिली भागविक्री आजपासून
केंद्रात मोदी सरकारच्या स्थापनेबरोबरीने सुधारलेल्या गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा प्राथमिक भांडवली बाजाराला लाभकारकतेची कसोटी म्हणून सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच आलेल्या स्नोमॅन लॉजिस्टिक्स या कंपनीच्या मंगळवारपासून खुल्या होत असलेल्या प्रारंभिक भागविक्रीतून लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First share market issue after nda comes into power