एटीएमचा दिवसेंदिवस वाढणारा उपयोग शाखांमधील गर्दी तसेच किरकोळ व्यवहार कमी करण्यास फायदेशीर ठरत असतानाच या क्षेत्रातील व्हिडिओ तंत्रज्ञानाने तब्बल ९० टक्क्य़ांपर्यंतचे अधिक व्यवहार पार पाडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
एनसीआरने केलेल्या एका अंतर्गत अभ्यासातून, एनसीआरच्या संवादात्मक व्हिडिओ तंत्रज्ञानामुळे उलाढालीचा कालावधी ३३ टक्क्यांनी कमी होतो आणि प्रती उलाढाल खर्च शाखेतील रोखपालासोबत केलेल्या उलाढालीच्या तुलनेत ४० टक्के कमी होतो.
आत्मीय इंडिया एटीएम २०१३ उपक्रमाचा एक भाग म्हणून एनसीआर कॉर्पोरेशनने एनसीआर अ‍ॅप्ट्रा इंटरअ‍ॅक्टिव्ह टेलरचे नुकतेच अनावरण केले. नवीन एटीएमवर आधारित हे एक नवे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे रोजची बँकिंग उलाढाल ग्राहकांसाठी सुलभ होण्यास मदत होते. ते सर्वसाधारण शाखा उलाढालीच्या तुलनेत एटीएमद्वारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक व्यवहार करू शकतात.
एनसीआर अ‍ॅप्ट्रा इंटरअ‍ॅक्टिव्ह टेलर भारतातील बँकांना आपले प्रादेशिक अस्तित्त्व वाढवण्यासाठी नवीन दृष्टीकोन अंगीकारण्यास मदत करेल आणि त्याचवेळी शाखेचे स्थान एका जास्त परिणामकारक सेवा व विक्री पर्यावरणात परावíतत करण्यात सहकार्यही करेल. यामुळे बँकांना आपल्या संपूर्ण रोखपाल सेवा अशा ठिकाणी देणे शक्य होईल जिथे शाखांचे अस्तित्व नाही. त्याचवेळी एनसीआर एटीएमच्या अद्ययावत वैशिष्टयांचा फायदाही त्यांना घेता येईल. यामध्ये बिल पे, नवीन अकाऊंट उघडणे आणि कर्ज सेवा यांचा समावेश असेल.
एका रोखपालाशी चर्चा करण्यापलीकडे इंटरअ‍ॅक्टिव्ह टेलरकडून अनेक सेवा दिल्या जातात. त्या एखाद्या एटीएमवर किंवा दुसऱ्या एखाद्या स्वयंसेवा साधनावर पार पाडल्या जाऊ शकतात. उदा. ग्राहक पारंपरिक एटीएम कार्डाचा वापर न करता सुरक्षित उलाढाल करु शकतात. शाखेतील रोखपालाप्रमाणे, दूरस्थ रोखपाल ग्राहकांना आपल्या खात्यांमधील सर्वसाधारण एटीएमच्या रोजच्या रोख रकमेच्या मर्यादेपलीकडे रोख रकमेचा उपभोग घेण्यास सहकार्य करतात.
‘एनसीआर कॉर्पोरेशन साऊथ एशिया पॅसिफिक  विभागाच्या वित्तीय व्यवसायाचे उपाध्यक्ष जयिवदर गिल याबाबत म्हणतात की, बँकेच्या रिटेल साखळी डावपेचांचा पुनर्वचिार करणे ही गोष्ट एक मोठे पाऊल असल्यासारखे दिसते. त्यामुळे या उपाययोजनांमुळे शाखेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शाखेच्या साखळीतील नफा वाढवण्यासाठी एक फायदेशीर दृष्टीकोन घेणे बँकांना शक्य होईल. एक सर्वसाधारण मिश्रित भरण्याला ६० सेकंदांपेक्षा कमी कालावधी लागतो. एका सर्वसाधारण शाखेत, रोख रकमा आणि चेक भरणा तसेच रोख रक्कम काढण्यात रोखपालाच्या काऊंटवरील ६० टक्के उलाढालींपेक्षा जास्त उलाढाली होतात.
८० टक्के उत्पादनांची विक्री आजही शाखेत केली जात असताना आíथक संस्थांनी उत्तम ग्राहक अनुभव देणे ही अत्यावश्यक बाब आहे. एनसीआर भारतातील आíथक संस्थांना सहकार्य करण्यासाठी सिद्ध असून त्यातून ते आपले नेटवर्क, उलाढाल, ग्राहकांचे समाधान, विक्री सक्षमता हे सर्व टिकवू शकतात, असेही ते म्हणाले.
बँकांच्या शाखा या अत्यंत महत्त्वाचे विक्रीचे साधन असून आíथक संस्थांसाठी महसूल निर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. परंतु त्या खíचक आहेत आणि बँकांना आपले अस्तित्व निर्माण करणे त्यामुळे कठीण जाते. एनसीआर अ‍ॅप्ट्रा इंटरअ‍ॅक्टिव्ह टेलर विस्ताराभोवतीच्या आव्हानांची उपाययोजना असून ग्रामीण भागातील बँकांची सेवा नसलेल्यिा लोकसंख्येला बँकांची सेवा पुरवणे त्यामुळे सोपे होईल, असे मत एनसीआर कॉर्पोरेशन इंडियाच्या वित्तीय सेवा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नवरोझ दस्तूर यांनी व्यक्त केले.
‘आत्मीय इंडिया एटीएम्स २०१३’ रोड शोमध्ये एनसीआरने विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण बँकिंग तंत्रज्ञानाचे दर्शन घडवले. त्यात एनसीआर सेल्फसव्‍‌र्ह ३२ चाही समावेश होता. हे एक आगळेवेगळे बंच नोट आणि चेक भरणा तंत्रज्ञान आहे. ते विविध आकडय़ांमधील रोख आणि चेक भरणा एकाच वेळी एकाच उलाढालीद्वारे करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा