महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी विकसित होऊ पाहणाऱ्या लवासा शहरात टाटा समूह १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. समूहामार्फत ताज या नामावलींतर्गत नवे पंचतारांकित आदरातिथ्य दालन सुरू होणार आहे. या शहरामध्ये देशविदेशातील पर्यटकांचा मोठय़ा प्रमाणात राबता असल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे ताज हॉटेलचे मुख्य कार्यकारी संचालक रेमंड ब्रिक्सन यांनी सांगितले.
लवासा येथील इकॉल हॉटेलिअर व्यवस्थापन या संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि दीक्षान्त समारंभ अलीकडेच झाला. या कार्यक्रमासाठी ताज हॉटेल समूहाचे मुख्य कार्यकारी संचालक रेमंड बिक्सन, अॅकॉर हॉस्पिटॅलिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेन मायकेल, इकॉल समूहाचे मुख्य संचालक प्रो. मायकेल रोचट आदी उपस्थित होते. स्वित्र्झलड येथील प्रसिद्ध इकॉल हॉटेलिअर व्यवस्थापन समूहाने लवासा येथे अद्ययावत महाविद्यालयाची उभारणी केल्याने भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हॉटेल व्यवस्थापनात चांगली प्रगती करू शकेल, असा विश्वास रेमंड ब्रिक्सन यांनी यावेळी व्यक्त केला.
लवासासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये आम्ही हे महाविद्यालय सुरू केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या वेळी प्रो. रोचट यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी आयोजित दीक्षान्त समारंभात २१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा