बुडीत कर्जाच्या समस्येचा सुरू असलेला पाठलाग, त्या परिणामी अनेक बडय़ा बँकांनी नोंदविलेल्या प्रचंड तिमाही तोटय़ाच्या पाश्र्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकिंग क्षेत्राचा वेध घेणारी बैठक बोलावली आहे. येत्या ६ जूनला ते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी या निमित्ताने चर्चा करतील. सरलेल्या २०१५-१६च्या चौथ्या तिमाहीत सार्वजनिक मालकीच्या बँकांच्या एकत्रित तोटय़ाचे प्रमाण २०,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे. बँकिंग अग्रणी स्टेट बँक तसेच कॅनरा बँकेसह आणखी काही बँकांची तिमाही कामगिरी अद्याप जाहीर झालेली नाही.

Story img Loader