जाहिरातीतून महिलांचा अवमान केल्याने चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर फोर्ड कंपनीला जाग आली असून फोर्डने या प्रकरणी माफी मागितली आहे.  फोर्ड फिगो या कारची जाहिरात करताना महिलांची चुकीची प्रतिमा रंगवून त्यांचा अवमान केल्याचा आरोप या कंपनीवर झाला होता. या जाहिरातीत इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वीओ बल्र्युस्कोनी कार चालविताना दाखविण्यात आले असून त्यांनी या कारच्या सामान ठेवण्याच्या जागेत तीन महिलांना बांधून ठेवल्याचे दाखविण्यात आले होते. हे दृश्य दाखविल्यानंतर ‘नवीन फिगोमध्ये तुम्ही तुमच्या सर्व कटकटी सहज ठेवू शकता,’ अशी टॅगलाइन या जाहिरातीत झळकत होती. या जाहिरातीची पोस्टर्सही अनेक देशांत लागली होती. या प्रकारानंतर सर्व थरांतून टीका झाल्याने फोर्डने ही जाहिरात मागे घेतली व सर्वाची माफी मागितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा