परदेशी गुंतवणूकदार शेअर्सच्या विक्रीचा मारा करतात आणि बाजार कोसळतो हे आपण म्हणतो, पण मुळात ते इथे गुंतवणूक करायला आले होते. याचा अर्थ आमच्याकडे काही चांगली परिस्थिती नक्कीच आहे म्हणून ते इथे आले हे लक्षात घ्यायला नको का? प्रचंड संख्येने ते विक्री करतात तेव्हा ते खरेदी करणारे आपल्याच देशातील म्युच्युअल फंडासारखे बलाढय़ गुंतवणूकदार असतातच ना? कुणी तरी विकत असतो, कारण समोर कुणी तरी खरेदी करीत असतो म्हणूनच हा व्यवहार होतो ना?
‘आíथक साक्षरता चोहीकडे’ या शीर्षकाखाली एक लेख मागील महिन्यात याच स्तंभात लिहिला होता. गेल्या १७ वर्षांत अनेक नवनवीन अशा ग्राहकाभिमुख सुधारणा शेअर बाजारात झाल्या त्याची माहिती याच स्तंभात वेळोवेळी दिली जात आहे. नुकताच सातारा येथील एका महाविद्यालयात सेमिनारच्या वेळी एका प्राध्यापकांनी अनेक प्रश्न विचारले, त्यात एनएसईवर खरेदी केलेले शेअर्स फक्त एनएसडीएलमध्येच विकू शकतो असे का आणि दोन डिपॉझिटरीची देशात गरज काय? असे प्रश्न होते. अनेक जणांच्या मनात काही चुकीच्या कल्पना रूढ झालेल्या असतात. एनएसडीएल जरी एनएसई म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या पुढाकाराने कार्यरत झाली असली आणि सीडीएसएल जरी बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या पुढाकाराने सुरू झाली असली तरी दोघांचे कार्य सारखेच आहे- शेअर्सची सुरक्षितता आणि दोघांवरही असलेले सेबीचे नियंत्रणही सारखेच आहे. त्यामुळे एनएसईमधून घेतलेले शेअर्स सीडीएसमधील आपल्या डिमॅट खात्यात जसे ठेवता येतात तसे बीएसईमधून घेतलेले शेअर्स आपल्या एनएसडीएलमधील डिमॅट खात्यात ठेवता येतात. दोन डिपॉझिटरीत असलेले आणखी एक साम्य म्हणजे दोन्हीकडे एक एक चंद्रशेखर आहे (टिळक आणि ठाकूर!).
नुकतेच दादर येथे एका कार्यक्रमात आम्हा दोघांना एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या! १६ वष्रे बीएसईमध्ये एकत्र काम केल्यानंतर मी सीडीएसएलला गेलो, तर टिळक एनएसडीएलला गेले इतकेच. त्यामुळे एनएसडीएलमध्ये किती डिमॅट खाती उघडली आणि सीडीएसएलमध्ये किती उघडली तसेच कोण किती पुढे आहे वगरे बिनमहत्त्वाच्या गोष्टींत आम्हा दोघांनाही रस नसतो. तर एकूण किती डिमॅट खाती या देशातील लोकांनी उघडली आहेत आणि त्याची संख्या कशी वाढेल हे आम्ही दोघेही पाहत असतो.
दोन डिपॉझिटरीची गरज काय, असे म्हणणाऱ्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, अनेक बँकांची तरी गरज काय? उदाहरणार्थ एकटय़ा स्टेट बँकेने देशात पाच लाख शाखा उघडल्या असत्या तरी त्याद्वारे बँकिंग सेवा मिळत राहिली असतीच ना!! मग इतर बँकांना परवानगी का दिली? तेच तत्त्व इथे आहे. गुणात्मक मूल्यावर आधारित स्पर्धा असली की आपोआपच सेवेचा दर्जा वाढतो. नाही का? शेअर बाजाराबाबत नेहमीच नकारात्मक बोलणाऱ्या मंडळींना वर उल्लेख केलेल्या कार्यक्रमातील चंद्रशेखर टिळक यांची चौफेर फटकेबाजी बरेच काही सांगून गेली असेल यात शंका नाही. ‘‘परदेशी गुंतवणूकदार शेअर्सच्या विक्रीचा मारा करतात आणि बाजार कोसळतो हे आपण म्हणतो, पण मुळात ते इथे गुंतवणूक करायला आले होते. याचा अर्थ आमच्याकडे काही चांगली परिस्थिती नक्कीच आहे म्हणून ते इथे आले हे लक्षात घ्यायला नको का? प्रचंड संख्येने ते विक्री करतात तेव्हा ते खरेदी करणारे आपल्याच देशातील म्युच्युअल फंडासारखे बलाढय़ गुंतवणूकदार असतातच ना? कुणी तरी विकत असतो, कारण समोर कुणी तरी खरेदी करीत असतो म्हणूनच हा व्यवहार होतो ना? १९९६ ते १९९८ या दोन वर्षांत फक्त काही हजार डिमॅट खाती उघडली होती या देशात, पण आज दोन कोटी २० लाखांहून जास्त डिमॅट खाती उघडली गेली आहेत ही बाब नक्कीच स्वागतार्ह आणि आश्वासक आहे..’’ चौफेर षटकार मारीत सुटलेला जसा सचिन तेंडुलकर तसे सुटले होते टिळक त्या दिवशी हे मात्र खरे!
ज्या मंडळींकडे शेअर्स सर्टििफकेट्स आहेत त्यांना ती डिमॅट करायची असतील, तर आता डिमॅट खाते उघडण्यासाठी पूर्वी लागणारी अॅग्रीमेंटवरील १०० रुपये स्टॅम्प डय़ुटी आता काढून टाकण्यात आली आहे. संयुक्त नावे असलेली शेअर्स सर्टििफकेट त्यापकी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ते नाव कमी करण्यासाठी कंपनीच्या आरटीएकडे सर्टििफकेट पाठवावे लागते, सोबत मृत व्यक्तीचा मृत्यू दाखलाही जोडावा लागतो. मात्र अनेक मंडळी हे करण्यासाठी ब्रोकरकडे जातात ज्याची काही गरज नसते. आपण स्वत: हे काम करू शकतो. दुसरा मार्ग म्हणजे सर्टििफकेटवर जी उर्वरित नावे आहेत त्या व्यक्तींनी एक संयुक्त खाते उघडून त्यात हे सर्टििफकेट डिमॅट करण्यासाठी आपल्या डीपीकडे द्यावे. यालाच Transmission cum Demat असे म्हणतात.
महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाच्या सूचनेनुसार अनेक वाचनालयांनी आíथक साक्षरता आणि शेअर बाजार या माझ्या विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. यामागील प्रेरणा असलेले अधिकारी म्हणजेच संचालक सनान्सेसाहेब. एखादा डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करून जन्माला घातलेल्या बाळाच्या बारशाला स्वत: हजर राहून आशीर्वाद देतो त्याप्रमाणे येत्या रविवारी वाशी येथे मराठी साहित्य संस्कृती मंडळात होणाऱ्या माझ्या व्याख्यानाला सनान्सेसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मागील लेखात ‘आयझिन कोड’बाबत लिहिले होते त्यावर विनिती खेडेकर यांनी विचारले आहे की, एखादा आयझिन कोड पूर्णत: बाद केला गेला असेल, उदाहरणार्थ ती कंपनी दिवाळ्यात गेली म्हणून, तर मग तो दुसऱ्या कंपनीला दिला जातो का? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. तो कायमचा बाद झाला, कारण त्यातील चार आकडे हे कंपनीचे नाव दर्शवीत असतात आणि कंपनीने अस्तित्व गमावल्यावर संलग्न कोडही बाद होतो.
कुणी तरी विकत असतो कारण, समोर कुणी तरी खरेदी करीत असतो
परदेशी गुंतवणूकदार शेअर्सच्या विक्रीचा मारा करतात आणि बाजार कोसळतो हे आपण म्हणतो, पण मुळात ते इथे गुंतवणूक करायला आले होते
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-01-2014 at 08:28 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign investors and indian buyers