देशातील फंड व्यवसायासह पहिल्या दोन खासगी म्युच्युअल फंड योजनांनी दोन दशकांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. फ्रँकलिन टेम्पल्टनच्या ब्ल्यूचिप फंड आणि प्रायमा फंड या फंडांनी कंपनीच्या पदार्पणासह सुरुवात केली होती.
फ्रँकलिन टेम्पल्टनने डिसेंबर १९९३ मध्ये अस्तित्त्वात आली. याचवेळी फंड क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले होते. याबाबत कंपनीचे अध्यक्ष हर्षेलू िबदाल यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षांत कंपनीच्या या योजनांमुळे गुंतवणूकदारांना त्यांचे उद्दिष्ट साध्य पूर्ण झाले, याचा आम्हाला अभिमान आहे. बाजाराची स्थिती गुंतवणूक व्यवस्थेचा दूरगामी विचार करण्यास पोषक असल्याचा दावाही त्यांनी केला. फंड कंपनीचे विविध ३७ योजना सध्या बाजारात असून देशातील आघाडीची विदेशी फंड कंपनी म्हणून कार्यरत आहे.
देशातील ३३ शहरांमध्ये कार्यालये असलेल्या या कंपनीचे १०० हून अधिक ठिकाणी सेवा केंद्रेही आहेत. कंपनी फ्रॅंकलीन टेम्पलटन इन्व्हेस्टमेन्ट या नावाने देशात व्यवहार करते. तिची मालकी मुळच्या अमेरिकेतील समुहाकडे आहे. गेल्या ६५ वर्षांहून अधिक या क्षेत्राचा या समुहाला अनुभव आहे. ऑक्टोबर २०१३ अखेर कंपनीची मालमत्ता ८६८.९० अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

Story img Loader