वाहनासाठी विमा घेतल्यानंतर बिकट प्रसंगी अनेक लाभ मिळविता येतात. मात्र ते सर्वोत्तम कसे ठरतात हे तुम्ही कारसाठी निवड करत असलेल्या विमा योजनेवर अवलंबून आहे. वाहनासाठी विमा योजना घेण्यापूर्वी प्रत्येक खरेदीदाराने संबंधित विमा कंपनीची मूल्ये, आचारसंहिता आदी विविध घटक जाणून घेणे आवश्यक आहे.
१. कंपनीचा इतिहास :
कंपनीचा इतिहास हा नेहमी दीर्घकालीन अस्तित्वापासूनच असला पाहिजे असे नाही. तर दावेदारांना देण्यात आलेल्या दाव्याच्या इतिहासावरून तो ठरवावा. यामध्ये कार्याचा इतिहास, सेवा दिलेल्या ग्राहकांची संख्या आणि ग्राहकांवर अर्थपूर्ण प्रभाव असलेले इतर घटक यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विमा कंपनीचे कायदेशीर पलू, विचारलेल्या दाव्यांची संख्या तसेच देण्यात आलेल्या दाव्यांची संख्या याबाबत तपासणी करावी; जर तुम्ही नाममुद्रेविषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते.
२. उत्पादन उपलब्धता :
कार विमा उत्पादने ही सामान्यत: विमा उद्योगांमध्ये समानच असतात. मग त्यातील फरक कसे ओळखणार? एक मजेशीर फरक म्हणजे, उपलब्ध असलेल्या ‘अॅड-अॅन कव्हर्स’ची विविधता होय. याचा अर्थ असा की, कार विमा कंपनी तुम्हाला वेगवेगळ्या स्थितीतील सूट-सवलती देते. यामुळे तुम्हाला योग्य संयोजन ओळखण्यास मदत होते.
३. ग्राहक सेवा :
जर काही समस्या असेल तर ग्राहक सेवा कशा प्रकारे आहे, ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. जरी प्रत्येक विमा कंपनी काटेकोरपणे ग्राहक सेवा देत असली तरीदेखील स्वत:हून विश्लेषण करणे हे नेहमीच चांगले असते. कारण काही वेळा कंपनीकडून अतिरिक्त चुकीची माहितीदेखील पुरविली जाते. जर तुम्ही विमा कंपन्यांची यादी तयार केली असेल तर त्यांच्या ग्राहक सेवेला दूरध्वनी करा आणि उत्पादने, दावे प्रक्रिया यावर अधिकाधिक प्रश्न विचारा. यामधून तुम्हाला नक्कीच भरपूर माहिती मिळेल.
४. प्रतिनिधींची योग्य प्रकारे निवड करा :
जर तुम्ही विमा प्रतिनिधींद्वारे विमा योजना खरेदी करत असाल तर अशा प्रतिनिधींची निवड करा की ज्याच्याशी तुमची स्थापित जवळीक आहे आणि ज्याच्याजवळ अधिकारपत्र आहे. प्रतिनिधी हे विमा बाजारपेठेतील महत्त्वाचे मध्यस्थी आहेत आणि एक चांगला विमा प्रतिनिधी तुम्हाला कठीणप्रसंगी बहुमूल्य मदत करू शकतो.
५. ऑनलाइन खरेदी करा :
बहुतेक सामान्य विमा कंपन्यांमध्ये ऑनलाइन पॉलिसी खरेदी करण्याची सुविधा आहे. तुम्ही केवळ तुमच्या प्रकारामधील विमा योजनेची समीक्षा करू शकता. एवढेच नाही तर क्षणार्धात योजनादेखील खरेदी करू शकता. ऑनलाइन नोंदणी करणे नेहमी उत्तम असते आणि अधिक माहितीकृत व स्पर्धात्मक निवड करण्यासाठी विविध कंपन्यांचा उल्लेख करू शकता. या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही उल्लेख केलेल्या कंपनीच्या खात्रीसाठी ग्राहक सेवा चमूसोबत प्रत्यक्षपणे बोलणे हे योग्य आहे.
६. योग्य प्रकारे संशोधन :
तुम्ही निवडलेल्या विमा कंपनीमध्ये याआधीच खरेदी केलेल्या विमाधारक ग्राहकांचे मत जाणण्यासाठी संकेतस्थळावर संपर्क साधू शकता. आजच्या काळात ग्राहक वेबसाइटद्वारे आपले मत व अनुभव प्रकट करण्यास नेहमीच अग्रेसर असतात. पण पुन्हा एकदा सावधनतेचा इशारा! जर तुम्हाला एखादे वाईट मत दिसले तर भावनावश न होणे हेच उत्तम आहे. चर्चा, सभेचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला चुकीची माहिती न मिळता योग्य मार्गदर्शन मिळेल. लोकांच्या अनुभवाचे बोल ऐका; पण अंतिम निर्णय हा तुमचाच असला पाहिजे.
लेखक ‘लिबर्टी व्हिडीओकॉन जनरल इन्शुरन्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा