येत्या मंगळवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त भांडवली बाजारातील गोल्ड ईटीएफसाठी होणाऱ्या व्यवहारांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजार- ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’वर गोल्ड ईटीएफसाठी २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ पर्यंत खरेदी-विक्री करता येणार आहे. सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत नियमित व्यवहार झाल्यानंतर गोल्ड ईटीएफचे व्यवहार सायंकाळी ४.३० ते ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यासाठी मुंबई शेअर बाजाराने या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, कोटक, रिलायन्स आदी कंपन्यांचे ईटीएफ बाजारात आहेत.
अक्षय्य तृतीयेनिमित्त ‘गोल्ड ईटीएफ’ व्यवहारांसाठी विस्तारित कालावधी
येत्या मंगळवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त भांडवली बाजारातील गोल्ड ईटीएफसाठी होणाऱ्या व्यवहारांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
First published on: 18-04-2015 at 01:42 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold etf