धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय तसेच मुंबई शेअर बाजाराच्या व्यासपीठावर सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या गोल्ड ईटीएफ व्यवहाराची नोंद रविवारी झाली. पैकी राष्ट्रीय शेअर बाजारात १,३३७ कोटी रुपयांचे तर मुंबई शेअर बाजारात ८९४.५५ कोटी रुपयांच्या गोल्ड ईटीएफची खरेदी-विक्री झाली. एनएसईवर ७० हजारांहून अधिक यूनिटची गुंतवणूक रविवारी झाली.
खास धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर होणारी सोने खरेदी लक्षात घेऊन भांडवली बाजारात सकाळी ११ ते दुपारी ३.३० दरम्यान या विशेष व्यवहाराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. प्रती एक ग्रॅम सोने म्हणजे एक यूनिट या प्रमाणाने हे व्यवहार दरवर्षी होतात. यंदा गोल्ड ईटीएफच्या रोखीतील व्यवहारांसाठी सर्व भांडवली बाजारांनी व्यवहार शुल्क माफ केले होते.
राष्ट्रीय शेअर बाजारात यंदा ४,४४१ किलो वजनाचे गोल्ड ईटीएफ व्यवहार झाले. ते गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीपेक्षा यंदा ८१ टक्क्यांने अधिक होते. तर मुंबई शेअर बाजारातही यंदा १,३९१ टक्के अधिक व्यवहार झाले. ९९.५ टक्के शुद्धतेची हमी, नाण्यांच्या तुलनेत द्यावे न लागणारे ५ ते ७ टक्के प्रिमिअम शुल्क, प्रत्यक्ष सोने खरेदीवरील असणारा एक टक्का मूल्यवर्धित कर येथे नसल्याने या व्यासपीठावर अधिक व्यवहार होत असल्याचे राष्ट्रीय शेअर बाजाराने म्हटले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा