गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात सोमवारी किंचित घसरण झाली. राजधानी नवी दिल्लीमध्ये सोन्याचे भाव दहा ग्रॅममागे २०० रुपयांनी घसरले. दिल्लीत सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ३१,५०० इतका नोंदवला गेला. त्याचवेळी चांदीच्या भावात वधारणा झाली. चांदीचे भाव प्रति किलोग्रॅममागे ४७० रुपयांनी वाढले. दिल्लीमध्ये चांदीचा भाव प्रति किलो ५४ हजार इतका झाला.
आशियातील बाजारापेठांमध्ये सोन्याचे भाव घसरल्याचा परिणाम भारतात दिसून आल्याचे सोन्याच्या व्यापाऱयांनी सांगितले. सिंगापूरमधील सोन्याच्या भावाचा भारतातील बाजारपेठेवर परिणाम होतो. सोमवारी तिथले भाव ०.२७ टक्क्यांनी घसरले. त्यामुळेच भारतातही सोन्याचे भाव घसरले. त्याचवेळी औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढल्यामुळे चांदीच्या भावात मात्र वधारणा झाली.

Story img Loader