सोने, घर-जमीन पर्यायातील कल ओसरला
अल्प बचतीसारखे पारंपारिक अथवा म्युच्युअल फंडसारखे आकर्षण असणारे पर्याय नव्या गुंतवणूकदारांनी गेल्या आर्थिक वर्षांत अव्हेरले आहेत. सोने अथवा स्थावर मालमत्तांसारख्या पर्यायांचेही तेच. याउलट अल्पावधीत अधिक परतावा देऊ पाहणाऱ्या भांडवली बाजारातील कंपन्यांच्या थेट समभागांमध्येच गुंतवणूक वाढल्याचा कल समोर आला आहे.
आíथक सेवा व्यवसायातील काव्‍‌र्ही समूहाच्या दलाली व्यवसायात असलेल्या ‘काव्‍‌र्ही प्रायव्हेट वेल्थ’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘इंडिया वेल्थ रिपोर्ट २०१५’ या अहवालात हा कल स्पष्ट करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील म्हणजेच २०१४-१५ या दरम्यानच्या विविध गुंतवणूक पर्यायांतील रकमेचा यासाठी आधार घेण्यात आला आहे.
भारतातील व्यक्तींकडील एकूण संपत्ती २०१४-१५ या आर्थिक वर्षांत ८.९ टक्के दराने वाढून २८० लाख कोटी रुपये झाली आहे. वित्तीय संपत्ती वर्गातील वैयक्तिक संपत्तीत १९ टक्के वाढ झाली. तर भौतिक संपत्तीत मात्र २.३ टक्के घट झाली. वित्तीय संपत्ती वर्गातील वैयक्तिक संपत्ती आधीच्या आर्थिक वर्ष २०१३-१४ मधील १३४.७० लाख कोटी रुपयांवरून गेल्या आर्थिक वर्षांत १६०.५० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. ही वाढ १९ टक्के असून, येत्या पाच वर्षांत ही वाढ दुप्पट म्हणजे ३२६ लाख कोटी रुपयांपर्यंत असेल, असे ‘काव्‍‌र्ही प्रायव्हेट हेल्थ’चा अंदाज आहे.
सोने, चांदी व प्लॅटिनम आदी जिनसांचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरलेले भाव यामुळे भौतिक संपत्तीतील वैयक्तिक संपत्ती २.३ टक्के घटून ११९ लाख कोटी रुपये झाली. तर स्थावर मालमत्ता क्षेत्रात किरकोळ ४ टक्के वाढ राखली गेली असून त्यातील एकूण गुंतवणूक रक्कम ५२.८० लाख कोटी रुपये राहिली आहे. २०१४-१५ मध्ये एक महत्त्वाचा कल बदललेला दिसला व तो म्हणजे घरगुती बचतीची नवी गुंतवणूक ही सोने व स्थावर मालमत्तेकडून वित्तीय संपत्तीत झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत भौतिक मालमत्तांमधील गुंतवणूक तुलनेने कमी झाली. २०१३-१४ मध्ये हा कल नेमका विरुद्ध होता. त्यामध्ये नव्या गुंतवणुकीपकी ६५ टक्के गुंतवणूक ही सोने आदी जिनस व स्थावर मालमत्तात झाल्याचे दिसून आले.
‘अर्थव्यवस्था विकसित होत असल्याने पर्यायी संपत्ती व म्युच्युअल फंड व समाभाग गुंतवणुकीत येत्या पाच वर्षांत अनुक्रमे २५ टक्के व ५४ टक्के दराने वाढेल,’ असे ‘काव्‍‌र्ही प्रायव्हेट वेल्थ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत भावे हा अहवाल प्रकाशित करताना म्हणाले.

Capture

Story img Loader