रांगेत ११ व्या महिन्यांतही देशाची निर्यात घसरती राहिली आहे. ऑक्टोबरमध्ये निर्यात १७.५३ टक्क्य़ांनी रोडावत २१.३५ अब्ज डॉलरवर आली आहे.
पेट्रोलियमयुक्त पदार्थ तसेच पोलाद, अभियांत्रिकी वस्तूंना असलेली मागणी अन्य देशांमधून यंदा कमी नोंदली गेल्याने भारताची निर्यात वार्षिक तुलनेत कमी झाली आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये ती २५.८९ अब्ज डॉलर होती.
गेल्या महिन्यातील आयात वार्षिक तुलनेत २१.१५ टक्क्य़ांनी कमी झाल्याचा दिलासा मिळाला आहे. ३१.१२ अब्ज डॉलरच्या ऑक्टोबरमधील आयातीमुळे या कालावधीतील व्यापार तूट कमालीची कमी झाली आहे. वर्षभरापूर्वीच्या १३.५७ अब्ज डॉलरवरून तूट यंदा ९.७६ डॉलरवर आली आहे.
चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान निर्यात १७.६२ टक्क्य़ांनी कमी होत १५४.२९ अब्ज डॉलरवर स्थिरावली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधी दरम्यान ती १८७.२ अब्ज डॉलर होती.
२०१५-१६ या वर्षांतील पहिल्या सात महिन्यांमध्ये व्यापार तूट ७७.७६ अब्ज डॉलपर्यंत कमी झाली आहे. ती वर्षभरापूर्वी याच कालावधीत ८६.२६ अब्ज डॉलर होती.
आयातीतील मोठा हिस्सा असलेल्या सोन्याची आयात यंदा तब्बल ५९.५ टक्क्य़ांनी कमी होत ती १.७० अब्ज डॉलर झाली आहे.
तेल तसेच बिगर तेल वस्तूंची आयात गेल्या महिन्यात अनुक्रमे ४५.३१ व ९.९३ टक्के कमी झाली आहे.

Story img Loader