आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने घसरत असलेल्या मौल्यवान धातूंच्या दरांमुळे भारतातही सोन्याच्या किमती १० ग्रॅमसाठी २०,५०० रुपयांवर येतील, असा अंदाज ‘इंडिया रेटिंग्ज अ‍ॅन्ड रीसर्च’ने व्यक्त केला आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह बैठकीत सप्टेंबरपासून व्याजदरवाढीचा निर्णय अमलात आल्यास सोन्याचे दर गेल्या पाच वर्षांच्या तळात विसावतील, असेही ‘इंडिया रेटिंग्ज’ने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औन्स ९०० ते १,०५० डॉलरदरम्यान राहतील, असे नमूद करतानाच मौल्यवान धातूचा हा २००९ नंतरचा किमान स्तर असेल, असे आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. सोन्याच्या मागणीबाबत वक्तव्य करताना संस्थेने धातूचा जागतिक स्तरावरील निम्मा ग्राहक असलेल्या चीन व भारतामार्फत २०११-१२ समकक्ष सोने साठा असेल, असेही स्पष्ट केले आहे. २०१५ च्या पहिल्या तिमाहीत चीनमधील सोने मागणी ८ टक्क्य़ांनी कमी, तर भारताची मौल्यवान धातू मागणी १५ टक्क्य़ांनी वाढण्याकडेही संस्थेने लक्ष वेधले आहे.

Story img Loader