स्थानिक बाजारात मौल्यवान धातूचे दर बुधवारी कमालीने वधारले. लग्नादीनिमित्ताने दागदागिन्यांच्या वाढत्या विक्रीने साठा करून ठेवण्याच्या दागिने निर्मात्यांच्या ओघाने सोने-चांदीचे दर उंचावले. मुंबईत तोळ्यासाठी सोन्याचा दर २७ हजारांनजीक गेला. तर चांदीचा एक किलोचा भावही ३८,५०० च्या पुढे गेला. स्टॅण्डर्ड सोन्याचा १० ग्रॅमचा दर एकाच सत्रात ४६५ रुपयांनी उंचावून २६,९०५ पर्यंत गेला. तर चांदीच्या किलोच्या दरात बुधवारच्या व्यवहारात १,३०० रुपयांची भर पडली.  

Story img Loader