भांडवली बाजारांपाठोपाठ सराफा बाजारातही गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबईत सोने तोळ्यासाठी २७ हजाराच्याही खाली आले आहे, तर चांदीचा किलोचा दरही आता ४१ हजारांच्या आत स्थिरावला आहे. शहरात स्टॅण्डर्ड सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर एकाच दिवसात २०० रुपयांनी कमी होत २६,९७५ रुपयांवर आला, तर शुद्ध सोन्याचा दरही याच वजनासाठी जवळपास याच प्रमाणात कमी होत २७ हजाराच्या उंबरठय़ावर राहिला. चांदीच्या दरात एकाच दिवसात किलोमागे झालेल्या ५४५ रुपयांच्या घसरणीमुळे पांढऱ्या धातूचा भावही आता ४१ हजारांच्या खाली, ४०,५२० रुपयांपर्यंत आला आहे.

Story img Loader