राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावाने तोळ्यामागे पुन्हा ३० हजार रुपयांचा स्तर सोमवारी गाठला. तब्बल तीन आठवडय़ानंतर मौल्यवान धातू या टप्प्यावर पोहोचले आहे. मुंबईतील सराफा बाजार मात्र डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी बंद होते. सोमवारी भांडवली व परकी चलन व्यवहारही झाले नाहीत.
नवी दिल्लीत मात्र स्टॅण्डर्ड सोने १० ग्रॅममागे २२० रुपयांनी वधारून ३०,००० रुपयांवर पोहोचले, तर २४ कॅरेट शुद्ध सोनेही झळाळून ३०,२०० रुपयांवर स्थिरावले. सोने यापूर्वी २४ मार्च रोजी समकक्ष पातळीवर होते, तर चांदीचा किलोचा दर सोमवारी १५० रुपयांनी उंचावत ४३,९०० रुपयांवर गेला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने तीन आठवडय़ापूर्वीच्या टप्प्यावर पोहोचले आहे.

Story img Loader