रिझर्व्ह बँकेने आयातीवरील निर्बंध शिथील केल्याने सोन्याच्या दरात प्रतितोळा ८०० रुपयांची घट झाल्याची खुशखबर आहे.
यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा(१० ग्रॅम) २८,५५० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत. परंतु, ही घट पुढे किती दिवस कायम राहते हे पाहणेही तितकचे महत्वाचे आहे. त्यात चढे आयात शुल्क आणि पुरवठय़ावरील र्निबधांमुळे जानेवारी ते मार्च या २०१४ च्या पहिल्या तिमाहीत भारताची सोन्याची मागणी थेट २६ टक्क्यांनी रोडावत १९०.३० टनवर आली होती. त्यामुळे भारतीयांची सोन्याची हौस कमी झाल्याचे चित्र होते. परंतु, आज रिझर्व्ह बँकेने आयातीवरील निर्बंध काहीप्रमाणात शिथील केल्याने सोन्याच्या दरात घट झाली. त्यामुळे सोन्याची मागणीही काहीदिवसांत वाढण्याची शक्यता आहे.
चालू खात्यावरील वाढती तूट आवरण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने वेळोवेळी मौल्यवान धातूवरील आयात शुल्क चढे ठेवले. आघाडीच्या अध्यक्षा व वाणिज्य व व्यापारमंत्री आनंद शर्मा यांनीही शुल्क कपातीसाठी आग्रह धरला होता. मात्र सरकारी तिजोरीवरील भार पाहता अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी सरकार हे शुल्क कमी करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

Story img Loader