तोळ्यासाठी गेल्या काही व्यवहारांपासून २५ हजाराखाली प्रवास करणाऱ्या सोने दराने आता चार वर्षांचा तळ गाठला आहे. मुंबईत सोने अद्यापही १० ग्रॅमसाठी २४,५०० च्या आसपास आहे. तर चांदीचा किलोचा भाव ३४ हजारांवर येऊन ठेपला आहे. नवी दिल्लीत पिवळ्या धातूने मात्र गुरुवारी २५ हजारांची पातळीही सोडली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औन्स ११००च्या खाली असे गेल्या पाच वर्षांच्या नीचांकात विसावले आहेत.
सोन्याच्या किमतीत कमालीचा उतार येण्यास चीनमधील आर्थिक मंदी हे मुख्य कारण आहे. सध्याचा कल पाहता सोन्याच्या किमती येत्या सहा महिन्यांत तोळ्यामागे २०,००० वरही येऊन ठेपतील अशी शक्यता आहे. तसे झाल्यास ३५,००० या सर्वोच्च स्थानापासून सोने ५० टक्क्य़ांनी खाली येईल. मात्र कमी किमती हे सोन्याची मागणी वाढण्यास कारणीभूत ठरतील, असे ‘बुलियन वार्तापत्र संशोधन अहवाला’चे मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा