मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढताना दिसत आहेत. MCX वर, सोने ऑक्टोबरमध्ये १७७ रुपयांच्या वाढीसह ४६,०६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहे. दरम्यान, चांदीचा सप्टेंबर वायदा ४७८ किंवा ०.७६ टक्क्यांच्या वाढीसह ६३,११५  रुपये प्रति किलोवर व्यवहार करताना दिसला.काल, एमसीएक्स वर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर सोने ६३९ रुपये अर्थात  १.३७ टक्क्यांनी घसरून ४६,३११ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदी १,३१७ म्हणजे २.०३ टक्क्यांनी कमी होऊन ६४,७१० रुपये किलो झाली.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याचे दर काही महिन्यांतील सगळ्यात खालच्या पातळीवर होते. याच कारण म्हणजे अमेरिकन बाँड उत्पन्नात वाढ आणि डॉलरला आलेली बळकटी आहे. डॉलर निर्देशांक दोन आठवड्यांच्या उच्चांकावर स्थिर राहिल्याने इतर चलनांच्या धारकांसाठी सोने अधिक महाग झाले. दुसरीकडे, स्पॉट गोल्ड १,७३०.४७ डॉलर प्रति औंस किरकोळ कमी झाले तर  यूएस गोल्ड फ्युचर्स ०.४% वाढून १,७३२.९० डॉलर प्रति औंस झाले. कामगार बाजारात सुधारणेची चिन्हे दिसू लागली. त्याच वेळी, यूएस ट्रेझरी उत्पन्न तीन आठवड्यांपेक्षा जास्त उच्चांपर्यंत पोहोचले.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

दरम्यान, मागील सत्रात आठ महिन्यांच्या नीचांकावर घसरल्यानंतर चांदी २३.४३ डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनम ०.१ टक्क्यांनी वाढून ९८०.८१ डॉलरवर स्थिर होते.फेडरल रिझर्व्हच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की अमेरिकेची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. तरीसुद्धा कामगार बाजारात अद्याप सुधारणेसाठी जागा आहे. महागाई आधीच एका पातळीवर आहे जी व्याजदर वाढीसाठी एक महत्त्वाच्या परीक्षेचा पहिला टप्पा पूर्ण करू शकते. जरी उच्च महागाईच्या विरोधात सोन्याकडे हेज म्हणून पाहिले जात असले तरी फेड दरात वाढ केल्याने त्याचे आवाहन कमी होईल.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने आणि चांदीचे भाव खालीलप्रमाणे

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,२७० रुपये आणि चांदीचा भाव ६२,८०० रुपये आहे. नवी दिल्लीमध्ये २२  कॅरेट सोने ४५,४९० रुपये आणि चांदी ६२,८०० रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये २२  कॅरेट सोन्याचा दर ४३,७९० रुपये आणि चांदीचा दर ६८,८०० रुपये प्रति किलो आहे. कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,७४० रुपये आणि चांदीचा दर ६२,८०० रुपये प्रति किलो आहे.

Story img Loader