ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव गेल्या ४ महिन्यांतील सर्वात कमी भाव राहिला आहे. हा पूर्ण महिना सोन्याचा दर कमी राहील अशी अपेक्षा आहे. गुड रिटर्न या वेबसाइटने दिलेल्या अहवालानुसार, सोन्याच्या किंमतीतील घसरणीमुळे खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे उभे करण्याची पुरेशी संधी उपलब्ध झाली आहे. भारतात आज सोन्याचे भाव कमी राहतील. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव स्थिर आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार स्पॉट सोन्याचे मूल्य १,७५०.३४ डॉलर प्रति औंस होते, तर अमेरिकन सोन्याचे वायदे १,७५३.४० डॉलरवर सपाट होते.
काय आहे आजचा भाव?
गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकेच्या नोकऱ्यांची आकडेवारी समोर आल्यापासून सोने रोलर-कोस्टर राइडवर आहे. आठवड्याभरापासून सोन्याच्या किंमती कमी होत आहेत. २२ कॅरेटच्या १० ग्रॅमसाठी मुंबईत सोन्याचा दर ४५,२८० रुपये आहे. पुण्यात सोन्याचा दर २२ कॅरेटच्या ४४,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर नागपुरात सोन्याचा भाव २२ कॅरेटच्या १० ग्रॅम प्रति ४५,२८० रुपये आहे. सुवर्णनगरी जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या चांदीचे दर घसरले आहेत. गेल्या २ दिवसात चांदीचे दर तब्बल ४ हजार रुपयांनी तर सोन्याचे दर १ हजार ३०० रुपयांनी खाली आले आहेत. बुधवारी जळगावात सोन्याचे दर ३ टक्के जीएसटीसह ४७ हजार ७०० रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर जीएसटी शिवाय ६३ हजार रुपये प्रति किलो आहेत.
(नमूद केलेल्या सोन्याच्या किंमतीमध्ये थोडा फरक असू शकतो, कारण किंमतींमध्ये चढ -उतार होतो आणि म्हणूनच स्थानिक ज्वेलर्सकडे किंमत तपासा)
सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी
सॉवरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजना २०२१-२२ मालिका ५-९ ऑगस्ट ते १३ ऑगस्टदरम्यान उघडण्यात आली आहे. सेटलमेंटची तारीख १७ ऑगस्ट २०२१ आहे. गोल्ड बॉण्डची किंमत बाजारातील सोन्याच्या स्पॉट प्राईसशी जोडलेली असते. यामध्ये गुंतवणुकीवरील व्याजाच्या स्वरूपात अतिरिक्त परतावा उपलब्ध आहे. अर्ज कालावधीत बॉण्डची इश्यू किंमत ४,७९० रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली. सॉवरेन गोल्ड बाँड योजना अशा गुंतवणूकदारांसाठी चांगली आहे, ज्यांना भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करायची नाही.