२२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा भाव बुधवारी १९० रुपयांनी वाढून ४६,३५० रुपये झाला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती सुधारल्याची प्रतिक्रिया आहे. यापूर्वीच्या ट्रेडमध्ये सोने प्रति १० ग्रॅम ४६,१६० रुपये किंमतीवर बंद झाले होते.गुड रिटर्न्स या संकेतस्थळाच्या मते, चांदी ९००  रुपयांनी वाढून ६३,६०० रुपये प्रति किलोवर विकली जात होती.

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या किंमतीमध्ये बदल दिसून येतो. नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये, २२ कॅरेटचा प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत अनुक्रमे ४६,३५० आणि ४६,४३० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ४५० रुपयांनी वाढून ४७,४३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.२४ कॅरेटची मुंबईत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,४४० आहे. पुण्यामध्ये २२ कॅरेटची प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,५३० तर २४ कॅरेटची प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४८,७५० रुपये एवढी आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेटचा प्रति १० ग्रॅम ४६,४४० आहे तर २४ कॅरेटचा प्रति १० ग्रॅम दर ४७,४४० रुपये असा आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेटचा प्रति १० ग्रॅम ४५,५३० आहे तर २४ कॅरेटचा प्रति १० ग्रॅम दर ४८,७५० रुपये असा आहे.

cocaine pizza germany
कोकेन पिझ्झा तुम्हाला माहितेय का? काय आहे नेमकं प्रकरण? का झाली कारवाई?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
gold and silver price incresed during festive sesson
सोने, चांदीच्या भावात वाढ होण्याची कारणे अन् आगामी काळात भाव कमी होणार का? जाणून घ्या…
Consumer Protection Act 2019, defects in goods and services., Consumer Protection, Consumer Protection news,
ग्राहक राजा सतर्क हो…!
Beauty Influencer Hacks
चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी कच्चा लसूण वापरणे फायदेशीर आहे का? वाचा तज्ज्ञांचे मत
workout pills
Workout Pill: आता जिमला जाण्याची चिंता मिटणार? व्यायामाची गोळी हा काय प्रकार आहे?
Will there be high sowing in Rabi season this year
यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरण्या होणार?
Raghuram Rajan Against Excluding Food Inflation From Interest Rates
व्याजदर निश्चित करताना खाद्यान्न महागाईला वगळणे गैर- रघुराम राजन

चांदीचा भाव

चांदीचा भाव आज प्रती १० ग्रॅम कालच्या किंमती पेक्षा १ रुपयाने कमी झाला आहे. ६३५ रुपये इतका १० ग्रॅमचा दर आहे. (वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज  नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच  दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.