गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १९० रुपयांनी कमी होऊन ४६,२१० रुपये झाला आहे. पूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति १० ग्रॅम ४६,४०० रुपयांवर बंद झाले होते. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चांदी ५०० रुपयांनी कमी होऊन ६१,७०० रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यानच्या किंमतीमध्ये भारतभर बदल दिसून येतो.
काय आहे आजचा सोन्याचा दर?
नवी दिल्ली आणि मुंबई येथे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे ४६,३०० आणि ४७,२१० रुपये असा आहे, असे वेबसाइटने म्हटले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही १९० रुपयांनी कमी होऊन ४७,२१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,२१० रुपये झाली आहे. पुण्यामध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,७०० रुपये आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,२१० आहे आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७,२१० रुपये आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,५०० रुपये आहे तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४८,१७० रुपये आहे.
चांदीचा भाव
कालच्यापेक्षा चांदीच्या भावामध्ये ५ रुपयांनी घट झाली आहे. आजचा चांदीचा दर हा ६१७ रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे. (वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.