२२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १० रुपयांनी कमी होऊन ४६,२०० रुपये झाला आहे. पूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति १० ग्रॅम ४६,२१० रुपयांवर बंद झाले होते. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चांदी ६१,७०० रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यानच्या किंमतीमध्ये भारतभर बदल दिसून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे आजचा सोन्याचा दर?

नवी दिल्ली आणि मुंबई येथे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे ४६,२९० आणि ४६,२०० रुपये असा आहे, असे वेबसाइटने म्हटले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही १० रुपयांनी कमी झाला आहे.  मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,२०० रुपये झाली आहे. पुण्यामध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,४९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,६९० रुपये आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,२०० आहे आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,२०० रुपये आहे.  नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,४९० रुपये आहे तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,६९० रुपये आहे.

चांदीचा भाव

कालच्यापेक्षा चांदीच्या भावामध्ये काहीच बदल झालेला नाही. काल भावामध्ये ५ रुपयांनी घट झाली होती जी आजच्या भावामाध्येही आहे. आजचा चांदीचा दर हा ६१७ रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे. (वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.