२२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ६० रुपयांनी वाढून ४६,२६० रुपये झाला. पूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति १० ग्रॅम ४६,२०० रुपयांवर बंद झाले होते. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चांदी ३०० रुपयांनी वाढून ६२,२०० रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यानच्या किंमतीमध्ये भारतभर बदल दिसून येतो.

काय आहे आजचा सोन्याचा दर?

नवी दिल्ली आणि मुंबई येथे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे ४६,४०० आणि ४६,२६० रुपये असा आहे, असे वेबसाइटने म्हटले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही ६० रुपयांनी वाढला आहे.  मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,२६० रुपये झाली आहे. पुण्यामध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,४५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,६६० रुपये आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,२६० आहे आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत  ४७,२६० रुपये आहे.  नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,४५० रुपये आहे तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,६६० रुपये आहे.

चांदीचा आजचा दर

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत चांदीचे दर कमी आहेत. २००८ नंतर चांदीचे दर वाढले. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात काही खास बदल झालेच नाहीत. २०१८ मध्ये, मुंबईत सोन्या -चांदीच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली कारण गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले आणि सोने आणि चांदी खरेदी केले. गुडरिटर्नस या वेबसाईटनुसार आजचा मुंबईतील चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६२० रुपये आहे. पुण्यासाठी १० ग्रॅमसाठी दर ६२० रुपये असा आहे. नाशिक आणि नागपूरमध्येही प्रति १० ग्रॅमसाठी ६२० रुपये इतकी आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Story img Loader