२२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १८० रुपयांनी कमी झाला असून ४६,४८० रुपये झाला आहे. पूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति १० ग्रॅम ४६,६६० रुपयांवर बंद झाले होते. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चांदी ६३,२०० रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. कालच्या दरापेक्षा चांदीच्या आजच्या दरात २० रुपयांनी घसरण झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यानच्या किंमतीमध्ये भारतभर बदल दिसून येतो.

काय आहे आजचा सोन्याचा दर?

दिल्ली आणि मुंबई येथे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे ४६,४९० आणि ४६,४८० रुपये असा आहे, असे वेबसाइटने म्हटले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरातही कालच्या किंमतीपेक्षा बदल झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,४८० रुपये झाली आहे. पुण्यामध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,७७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,४९० रुपये आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,४८० आहे आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७,४८० रुपये आहे.  नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,७७० रुपये आहे तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४८,३७० रुपये आहे.

चांदीचा दर

कालच्यापेक्षा चांदीच्या भावामध्ये २० रुपयांनी बदल झालेला आहे. आजचा चांदीचा दर हा ६३,२०० रुपये प्रति १ किलो असा आहे. (वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

 

 

Story img Loader