सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होताना दिसतात. यामागे वेगवेगळी कारणं असतात. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज १० रुपयांनी घसरून ४६,४९० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४६,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,५०० रुपये प्रति किलोने विकली जाईल. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिने किंमतीमध्ये बदल दिसून येतो.

सोन्याचा काय आहे आजचा दर?

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४७,४९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,४९० रुपये झाला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,४९० एवढा झाला आहे. पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,११० प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,८७० रुपये इतका आहे. सोन्याच्या बाजारपेठेतलं आणखीन एक महत्त्वाच शहर म्हणजे नागपूर. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,४९० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,४९० रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४९,११० आहे व २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,८७० रुपये एवढा आहे.

चांदीचा आजचा दर

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत चांदीचे दर कमी आहेत. २००८ नंतर चांदीचे दर वाढले. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात काही खास बदल झालेच नाहीत. २०१८ मध्ये, मुंबईत सोन्या -चांदीच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली कारण गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले आणि सोने आणि चांदी खरेदी केले. गुडरिटर्नस या वेबसाईटनुसार आजचा मुंबईतील चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६३५ रुपये आहे. पुण्यासाठी १० ग्रॅमसाठी दर ६३५ रुपये असा आहे. नागपूर आणि नाशिकमध्येही चांदीचा दर हा १० ग्रॅमसाठी ६३५ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Story img Loader