आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,९५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,९४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,९५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,९५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,०६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,८९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,९५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१८ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये ६ रुपयांचा फरक आहे.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे
On Monday December 9 price of gold rise three times in four hours from morning
सोन्याच्या दरात चार तासात तीनदा बदल, हे आहेत आजचे दर…
Gold Silver Rate Today 9 December 2024
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं की महाग!आठवड्याभरात दरात नेमकं काय झाले बदल? जाणून घ्या
cocaine smuggling in india
कोकेनसह अवैध वस्तूंच्या तस्करीसाठी केसांचे विग अन् पुस्तकांचा वापर; भारतात तस्करीत वाढ होण्यामागील कारणे काय?

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Story img Loader