मोठय़ा प्रमाणावर अवलंबित्व असलेल्या सोने, चांदी, कच्च्या तेलासारख्या जिनसा नजीकच्या दिवसात अधिक महाग होणार आहेत. सरकारला सतावणाऱ्या चालू खात्यातील तुटीवर नियंत्रण येत नसल्याने आयात करावे लागणाऱ्या सोन्या, चांदीच्या मौल्यवान धातूंवर अधिक शुल्क आकारण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. तुटीला मुख्यत: जबाबदार असलेल्या अमेरिकन चलनापुढे नांगी टाकणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी पावले उचलण्याचे स्पष्ट करतानाच पी. चिदम्बरम यांनी देशाबाहेरून होणारी कर्जउचल मात्र स्वस्त करण्याचे निदर्शन दिले आहे. देशात अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून विदेशी निधीचा ओघ वाढविण्यासाठी त्यांना ठेवींवर अधिक व्याजदराची लालसा दिली जाऊ शकते.
गेल्या महिन्यात निर्यात वाढून आणि आयात कमी होऊन तूट कमी झाली असली तरी डॉलरच्या समोर रुपयाची कमकुवकता अद्यापही ६१ च्या खालीच आहे.

Story img Loader