Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४८,४०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,५५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,४०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,८०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,४८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,८८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,४८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,८८० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३५ रुपये आहे.

Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या
pune gold jewellery stolen loksatta news
पुणे : कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी
Error in gold import data due to double counting government clarification
दुहेरी मोजणीमुळे सोने आयातीच्या आकडेवारीत चूक – सरकारची स्पष्टोक्ती
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Story img Loader