आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,६१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,६१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,८५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,६५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,६१० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०७ रुपये आहे.

Gold prices today, market
सुवर्णवार्ता! सोन्याच्या दरात प्रथमच घसरण, हे आहेत आजचे दर…
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते…
nagpur Gold prices are rising daily reaching record high on Saturday October 19
दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने सर्व विक्रम मोडले; हे आहेत आजचे दर…
Gold & Silver Price Hike: Record High Rates Before Diwali
Gold Silver Price : दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ! चांदीचा दर ९० हजाराच्या पुढे; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा दर
pune husband kills wife
चारित्र्याच्या संशयातून महिलेच्या डोक्यात सिलिंडर घालून खून, विश्रांतवाडी भागातील घटना; पती गजाआड
Three man arrested for abducting a five month old baby in thane crime news
पाच महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या त्रिकुटास अटक; राबोडी पोलिसांनी चार तासात केली बाळाची सुटका
gold silver price today 7 october 2024
Gold Silver Rate Today : नवरात्रोत्सवादरम्यान सोने चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर
Loksatta chaturang bhay bhuti Fear of an event in life
‘भय’भूती: भय-भोवरा

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.