आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,८०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये या या मौल्यवान धातूची किंमत ४५,८०० रुपये प्रति ग्रॅमवर बंद झाली. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,८०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,०५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,००० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,००० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३० रुपये आहे.

bullion market crowded
दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यभरात सोने खरेदीची लगबग
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
12th October 2024 Petrol diesel price in marathi
Petrol Diesel Rates Today : आज दसऱ्याच्या मुहूर्तावर वधारला का पेट्रोल-डिझेलचा भाव? तुमच्या शहरांत किती रुपये मोजावे लागणार?
Ahmednagar land grabbed cases
‘जागा लुटीं’चे नगर जिल्ह्यात दीड वर्षात २७ गुन्हे; २१३ आरोपी
Drugs worth one crore seized in Dhule district
धुळे: अबब… एक कोटीचे अमली पदार्थ जप्त
3rd October 2024 Petrol Diesel Price
Petrol & Diesel Price : महिन्याच्या तिसऱ्या दिवशी पुण्यात वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव; १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
amazon india announces significant reduction in selling fees
ॲमेझॉनकडून विक्रेत्यांच्या शुल्कात कपात; दिवाळीच्या तोंडावर पाऊल; राज्यातील १ लाख ८० हजारांना फायदा
Local crime investigation team exposed chain adulterating food spices with harmful dyes and chemicals
धुळे: मसाल्यांमध्ये ही भेसळ करुन लोकांच्या आरोग्याशी खेळ

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी?

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.